३० वर्षानंतर जमला विद्यार्थ्यांचा मेळा… देवगाव येथील विद्यार्थ्यांनी दिला शालेय आठवणींना उजाळा…

निफाड न्यूज :  अमोल तुपे.  श्री.डी.आर.भोसले विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी ३० वर्षानंतर एकत्र येेत पुन्हा शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. येथील श्री.डी.आर.भोसले विद्यालयातील सन‎ १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि.१२) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने झाली. शालेय जीवनानंतर १९९५ बँचच्या दहावीच्या अशा काहीशा आठवणी मनात ठेवून, शाळेतील धमाल, […]

सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यात पत्रकारांची मोलाची भूमिका : तहसीलदार विशाल नाईकवाडे. निफाड तहसील कार्यालयमार्फत पत्रकारदिन निमित्त पत्रकारांचा सन्मान.

निफाड न्यूज वृत्तसेवा :                   “पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. समाजातील सत्य आणि पारदर्शकता जपण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करतात. त्यांच्या लेखणीमुळे समाजाला योग्य दिशा मिळते. शासनाच्या योजना सोप्या शब्दांमध्ये नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य पत्रकार करत असल्यामुळे शासनाचा लोकजागृतीचा बराचसा ताण हलका होतो, पत्रकारांचे असे कौतुक निफाड तहसीलदार विशाल […]

५३ वर्षे वादात असलेल्या अतिक्रमीत रस्त्यास मिळाला अखेर न्याय… महसूल अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शेतरस्ता अखेर खुला.

निफाड न्यूज वृत्तसेवा :                अर्धशतक पार होऊन देखील वादात असलेल्या शेतरस्त्यास अखेर न्याय मिळाला. महसूल कर्मचाऱ्यांनी अतिक्रमीत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून हा वाद कायमस्वरूपी सोडविला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वर्षोनुवर्षे घोंगडं भिजत पडलेल्या रस्त्यांचा प्रश्न मिटावा, शेतकऱ्यांचे रस्ताप्रश्न दूर व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पानंद रस्ता […]

देवपूर येथील वाचनालयात दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शन.

निफाड न्यूज वृत्तसेवा : देवपुर (ता.निफाड) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सार्वजनिक वाचनालयात दि. ३० आणि ३१ तारखेस ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस आणि नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम महाराष्ट्रभर १ जानेवारी ते […]

संताजी महाराज जगनाडे हे मानवधर्माची शिकवण देणारे संत : दिगंबर सोमवंशी. देवगाव येथे संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी.

देवगाव : अमोल तुपे. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेत. संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा […]

विहिरीत पडलेल्या मांजरीला सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षाच्या आर्यनने दिले जीवदान.

  देवगाव : मनोहर बोचरे माणूस आणि पाळीव प्राणी यांचे नाते गेल्या कित्येक पिढ्यांपासून खूप जवळचे राहिलेले आहे. इमानदारी निभावताना पाळीव प्राणी कित्येकदा मालकासाठी जीवाची बाजी लावतात. मात्र, माणूसदेखील अनेकदा आपल्या मित्रासाठी असा प्रयत्न करतो. अशीच एक घटना समोर आली असून दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील ओझरखेड कनाॅल नजिक आहेर वस्ती येथील ५० फूट खोल विहिरीत […]

देशातील पहिल्या श्रीराम सृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण भव्य दिव्य श्री प्रभूरामचंद्र व सुवर्णमृगाच्या शिल्पाची आकर्षक उभारणी

  शिरवाडे वाकद :- किरण आवारे.  “श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत माझ्या हस्ते प्रभू श्रीराम सृष्टीचे लोकार्पण होत आहे ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट असून यापुढे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रभू श्रीराम सृष्टीसाठी सर्वतोपरी मदत राहील,”  असे प्रतिपादन भाजपचे उज्जैन येथील खा.महंत उमेशनाथजी महाराज यांनी केले. श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनित […]

बिबट्याच्या वारंवार हल्ल्याने देवगावकर धास्तावले… वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी : उपसरपंच लहानू मेमाणे यांची मागणी.

निफाड न्यूज : देवगाव प्रतिनिधी.       गेली दिड महिन्यांपासून बिबट्याने देवगाव आणि परिसरात उच्छाद मांडलेला आहे. नागरिक, वाहनचालक, गुराखी यांच्यावर हल्ला होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. सायंकाळी देवगाव फाटा ते देवगाव रस्त्यावर नागरिकांचा कर्फ्यु लागला असल्याचे चित्र असून सायंकाळी सातच्या आत घरात अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. परिसरात पिंजरा लावलेला असून देखील बिबट्या […]

नागपूर हिवाळी अधिवेशनात कोतवालांना न्याय द्या  नाशिक जिल्हा कोतवाल संघटनेची मागणी

निफाड न्यूज वृत्तसेवा : दि.१३             महसूल विभागातील महत्त्वाचे घटक असलेल्या कोतवालांच्या हक्कांसाठी नाशिक जिल्हा कोतवाल संघटनेने आवाज उठवला आहे. संघटनेच्या वतीने नांदगाव विधानसभा आ. सुहास कांदे यांना आज (दि.१३) निवेदन देण्यात आले. या निवेदनात गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थश्रेणी सेवकांचा दर्जा द्यावा, तलाठी भरती व अन्य शासकीय सेवांमध्ये […]

ग्रामीण भागातून घेतली भरारी…गोईरत्न पुरस्काराची साजरी फेरी. आरोग्यसेविका पूजा रुपटक्के यांचा सेवाप्रवास.

चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज.                परिस्थिती माणसाला झुंजायला शिकवते. गरिबी खायला उठली असेल तर तीला नेस्तनाबूत करण्यासाठी आणि निदान दोन वेळची भाकरी निवांत खायला मिळावी यासाठी तरी माणूस लढाईसाठी प्रवृत्त होतो. उभा राहतो. लढतो. धडपड, तळमळ, अपार मेहनत, कष्ट, ही मूल्ये वाचनात नसली तरी गरिबीमुळे तळहाताच्या रेषांच्या पाऊलवाटेने […]

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे