निफाड न्यूज : अमोल तुपे.
श्री.डी.आर.भोसले विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी ३० वर्षानंतर एकत्र येेत पुन्हा शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. येथील श्री.डी.आर.भोसले विद्यालयातील सन १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि.१२) उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने झाली. शालेय जीवनानंतर १९९५ बँचच्या दहावीच्या अशा काहीशा आठवणी मनात ठेवून, शाळेतील धमाल, मित्रांसह केलेला दंगा या आठवणीतून बाहेर पडून माध्यमिक शाळेत शिक्षण घेऊन बाहेर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वय, नोकरीचे क्षेत्र, धकाधकीचे जीवन या सगळ्याच सीमा ओलांडत स्नेह मेळाव्याला हजेरी लावत आपल्या ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पत्ते शोधून त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी कृतज्ञतापूर्वक केलेल्या सरकारने शिक्षक भारावून गेले होते. व्ही.एल .भागवत, के. बी वाघ , एस. बी. ठाकरे , बी. जे.बच्छाव, आर. एस.बच्छाव, आर. एस भदाणे, बी. आर.सालगुडे यांच्या आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजन यांचा शाल, गुलाब पुष्प, श्रीमद्भगवद्गीता, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, सन्मान पत्र, पुस्तक भेट देऊन गौरव केला. सन १९९५ मध्ये इयत्ता दहावीची प्रथम बॅच शिक्षण घेऊन बाहेर पडली होती.
संतोष घाडगे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उपसरपंच लहानु मेमाने, अमोल कुलथे, महेश लोहारकर , अरूण गव्हाणे, मंगला निलख, वर्षा सोमवंशी यांनी सर्व विद्यार्थी मित्र परिवाराशी संपर्क साधून हा योग जुळून आणला. आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करत काही विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करत सर्व शिक्षक व विद्यार्थी एकत्र जोडले. या सर्व गुरुजन व विद्यार्थी यांचे स्नेहसंमेलन जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील अध्ययन अनुभव, एकत्र केलेला अभ्यास, रात्र अभ्यासिका, शिक्षकांनी केलेल्या शिक्षा, शाबासकी, सांस्कृतिक कार्यक्रम, कवायत इत्यादी खूप साऱ्या आठवणींना उजाळा दिला. सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणी मध्ये हरवून गेले होते. इतक्या वर्षांनी सर्व वर्ग मित्र भेटल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी डॉक्टर नानासाहेब मेमाणे यांच्यावतीने ७० हून अधिक मित्रांना श्रीमत भगवद्गीतेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी बोचरे, अँड अरविंद बडवर, डॉ नानासाहेब मेमाणे, विजय तुपे, दिनेश जगताप, विठ्ठल साबळे, मीना पेंढारे, योगेश भुसारे,भगवान जाधव,अंबादास गोसावी,नाना घाडगे, सुनील वाघ,संतोष लोहारकर, निलेश निकम आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष घाडगे, सविता गोसावी यांनी तर आभार लहानु मेमाने यांनी मानले.
विद्यार्थी दशा व तारुण्यातील मैत्री ही शेवटपर्यंत स्मरणात राहते. बऱ्याच दिवसानंतर मित्र भेटले म्हणजे होणारा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही.आम्ही मित्रांनी तब्बल ३० वर्षानंतर एकत्र येत विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देऊन आपली मैत्री दृढ असल्याचे सिध्द केले.
– डॉ.नानासाहेब मेमाने