निफाडच्या लोकन्यायालयात ९१० प्रकरणांतुन ४ कोटी ७२ लाख ५२ हजारावर रक्कम वसुली

किरण आवारे : शिरवाडे वाकद निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निफाड न्यायालयातील न्यायप्रविष्ठ व दाखलपुर्व अशा एकुण ११ हजार ४७१ पैकी ९१० प्रकरणांत तब्बल ४ कोटी ७२ लाख ५२ हजार ९३७ रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश […]

सैनिकांचे माता पिता देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण : सहा. पो. निरीक्षक भास्कर शिंदे.  लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती निमित्त सैनिकांच्या माता पित्यांचा गोंदेगाव येथे सन्मान. 

निफाड न्यूज वृत्तसेवा :           सीमेवर असलेल्या जवानांच्या माता पित्यांचा सन्मान करणे ही आगळीवेगळी गोष्ट आहे. हा सन्मान आयोजित करणाऱ्या आयोजकांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. ही बाब जवानांना आनंद देणारी ठरणारी असून  शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक भास्कर शिंदे यांनी व्यक्त केले. गोंदेगाव (ता.निफाड) […]

निधन वार्ता.

धामोरी ता.कोपरगाव येथील वारकरी संप्रदायाचे गं भा मनुबाई मोहन शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तिन मुले, एक मुलगी सुना, नातवंड असा परिवार आहे. त्या महाराष्ट्र नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश,भास्कर,रतन शिंदे यांच्या मातोश्री आणि देवगाव येथील पत्रकार प्रमोद आणि अमोल तुपे यांच्या आजी होत.

लाटेवर स्वार होऊन विजयी होण्याचे स्वप्न बघण्याचा हा काळ नाही : डॉ. श्रीकांत आवारे यांची टिका… पाचव्या टर्मला देखील भुजबळ यांच्यावरच गुलाल पडणार असल्याचा विश्वास केला व्यक्त.

येवला – लासलगाव मतदारसंघात उमेदवारी मरत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मागील दहा वर्षांत जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात कोणी बघितले असेल तर मला सांगावे, मी रोख बक्षीस जाहीर करतो. निवडून येण्यासाठी आधी चार वर्षे खर्ची घालावी लागतात.  लाटेवर स्वार होऊन निवडून येण्याचे स्वप्न बघण्याचा हा काळ नसल्याने  यावेळी देखील विकासच जिंकणार.. त्यामुळे येवला – लासलगाव मतदारसंघात […]

कुर्यात सदा मंगलम …. तुळशी विवाहास प्रारंभ ….

गोळेगाव (ता.निफाड) येथील श्री. वाल्मिक मुदगुल यांच्या वस्तीवर आज (दि.१३) तुळशी विवाह संपन्न झाला. भगवान विष्णू आणि तुळशीच्या प्रतीकात्मक विवाह सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असे पाच दिवस तुळशी विवाहाचे ‘कुर्यात सदा मंगलम’ हे स्वर ठिकठिकाणी कानी पडणार आहेत. यथोचित पूजा, भटजी यांचे मंगलाष्टके यांद्वारे हा […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे ठार.

तालुक्यातील कोटमगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना घडली आहे. काल (दि.११) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास कोटमगाव – खामगाव रस्त्यावर ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या मादी आपल्या चार बछडेंसोबत रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. याबाबत वनअधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामा केला.

मतदारांना मूलभूत सुविधांची उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा… निफाड विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा…

मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांची उपाययोजना करून मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्या. त्यांनी काल (दि.११) निफाड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची पाहणी करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना केल्या.        आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तात्काळ दुरुस्ती डागडुजी करावी. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान […]

कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून विकाकामांची माहिती द्यावी : सौ. विशाखा पंकज भुजबळ. देवगाव येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन….

“मतदानास कमी कालावधी राहिलेला आहे. या कमी वेळात देवगाव गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाडी वस्ती आणि घरोघरी जाऊन छगन भुजबळ यांनी केलेली विकासकामे सांगावीत. मागील वीस वर्षांपासून सुरू असलेली विकासगंगा भविष्यात सुद्धा सुरू राहील, याची काळजी घेण्याचे आवाहन सौ. विशाखा भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले. देवगाव (ता.निफाड) येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज (दि.१०) भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी […]

विशाखा भुजबळ आज लासलगाव दौऱ्यावर… प्रचार कार्यालयाचे करणार उदघाटन…

आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ लासलगाव – येवला मतदारसंघात गृहभेटी घेत आहेत. काल (दि. 09) जिल्हा परिषद देवगाव गट पिंजून काढल्यानंतर विशाखा भुजबळ आज (दि.10) लासलगाव गटाच्या दौऱ्यावर आहेत. थेटाळे, वनसगाव, ब्राह्मणगाव, टाकळी विंचूर, लासलगाव, पिंपळगाव […]

आ. पंकज भुजबळ यांचा उद्या विंचूर गटात दौरा… कोणत्या गावांना देणार भेटी ? जाणून घ्या.

मा. आ. श्री.पंकज भुजबळ हे उद्या (दि.09) छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ विंचूर व परिसरातील गावांचा दौरा करणार आहेत. विविध नगरे, वाडी, वस्त्या यांच्यासह गृहभेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डोंगरगांव, गोंदेगाव, पाचोरे बु. पाचोरे खुर्द, शिवापूर, वेळापूर, निमगाव वाकडा, ब्राह्मणगाव, विठ्ठलवाडी, किसनवाडी, सुभाष नगर, हनुमाननगर, विष्णूनगर, विंचूर असा त्यांचा प्रचार दौरा राहणार आहे. या […]

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे