मायबोलीला ८ सुवर्ण ७ रौप्य व ७ कांस्य पदककांसह एकूण 22 पदके.

निफाड न्यूज : दि. 17.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद नाशिक व सक्षम फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा शनिवार (दि.१७) नाशिक येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या प्रांगणात पार पाडल्या. या स्पर्धेत समता प्रतिष्ठान येवला चालवीत असलेल्या मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयातील २१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारामध्ये सहभाग घेतला होता.

            ८ ते १२ या वयोगटांमध्ये ५० मीटर धावणे क्रीडा प्रकारात मुलांमध्ये खुशाल संजय बिरारी याचा प्रथम क्रमांक तर साई राहुल बोराडे यांचा याने तृतीय क्रमांक पटकाविला तर मुलींमध्ये प्रतिक्षा किरण जाधव हिने प्रथम क्रमांक मिळविला. लांबउडी या क्रीडा प्रकारामध्ये मुलींमध्ये प्रतीक्षा किरण जाधव हिने प्रथम क्रमांक रीना आत्माराम जाधव हिने द्वितीय क्रमांक तर मुलांमध्ये खुशाल संजय बिरारी यांनी द्वितीय क्रमांक तर साई राहुल बोराडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १३ ते १६ या वयोगटांमध्ये लांबउडी या क्रीडा प्रकारात प्रशांत संजय देवरे याने द्वितीय मुलींमध्ये ऋतुजा भगवान शेंडगे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तर गोळाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये मुलींमध्ये भाग्यश्री किरण जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला. १७ ते २१ या वयोगटांमध्ये २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात ज्ञानेश्वरी योगेश कड हिने प्रथम क्रमांक, पवन वाल्मीक फापाळे याने द्वितीय क्रमांक तर प्रेम सोमनाथ तांदळे याने तृतीय क्रमांक मिळविला. ४०० मी धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये राज ज्ञानेश्वर अहिरराव यांने प्रथम क्रमांक तर दिव्या अरुण कदम हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर त्याच वयोगटात लांब उडी या क्रीडा प्रकारात ज्ञानेश्वरी योगेश कड हिने प्रथम क्रमांक, राज ज्ञानेश्वर अहिरराव यांने द्वितीय क्रमांक, मुलींमध्ये तेजल गणेश कोळपे तर मुलांमध्ये प्रेम सोमनाथ तांदळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. १७ ते २१ या वयोगटासाठी घेण्यात आलेल्या गोळाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये मुलांमध्ये पवन वाल्मीक फापाळे याने प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये पूजा नंदू जगताप हिने प्रथम क्रमांक व प्रतीक्षा सुदाम देवरे हिने द्वितीय क्रमांक पटकविला.

          या दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन नाशिक विभागीय उपायुक्त माधव वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, सक्षम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वै. सा. का.भरत चौधरी, सेंट झेवियर हायस्कूलचे मुख्य फादर या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या क्रीडा स्पर्धेत मायबोली विद्यालयातील वरील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी ८ सुवर्ण, ७ रजत तर ७ ब्रांझ पदके अशी एकूण २२ पदके पटकविली आहेत. सुवर्णपदक विजेत्या ८ विद्यार्थ्यांची राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. 

यशस्वी सर्व स्पर्धकांचे व शिक्षकांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर मॅडम व संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, वैसाका भरत चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी  अभिनंदन केले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील हेमंत पाटील, सुखदेव आहेर, संतोष कोकाटे, मंदा पडोळ, ऋषीकेश वाघ, अभिजित गुंजाळ, रावसाहेब खराटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे