
निफाड न्यूज : चंद्रकांत जगदाळे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नसली, तरी स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींची नैसर्गिक हालचाल सुरू झाली आहे.. निफाड तालुक्यात थंडीचा पारा घसरला आहे; मात्र राजकीय चर्चांची गरमी मात्र वाढत चालली आहे.. ग्रामविकासाच्या मागण्यांपासून ते प्रशासकीयस्तरावर कामकाज पूर्ण करून घेण्याबाबत उमेदवारांची कार्यकुशलता, परिसरात झालेली आणि न झालेली कामे, समस्या असे अनेक विषय सध्या शेकोटी भोवती चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत अंदाज, चर्चा आणि विश्लेषण याबाबत देखील अनेकानेक मते ऐकायला मिळत आहेत. गावागावांतील पायाभूत सुविधा, शासकीय कार्यालये आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांतील बदलत्या परिस्थितीमुळे नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षांमध्येही गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे पुढील काळात कोणत्या प्रकारचे नेतृत्व आवश्यक ठरेल, याबाबत आता पासूनच जनतेने चर्चा सुरू केली आहे.
याच एकूण वातावरणात डोंगरगाव गणात महेश मेथे पाटील हे नाव चर्चांमध्ये आघाडीवर असलेले दिसते.. त्यांच्या कार्यशैलीचा, कर्तृत्वाचा आणि सार्वजनिक व्यवहारातील सातत्याचा मागोवा घेतला असता स्थिर व शांत नेतृत्वाची गरज डोंगरगाव गणात असल्याचा काहींचा अंदाज आहे.. प्रशासकीय कामकाजाची जवळून ओळख, स्थानिक पातळीवरची सर्व कार्यक्रमांत नेहमी असलेली उपस्थिती, आणि गरजेच्या प्रश्नांवर वेळेवर प्रतिसाद देण्याची सवय ही काही वैशिष्ट्ये त्यांच्याबाबत नोंदली जात असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधी उमेदवारांना दबाव नक्कीच जाणवेल असं म्हंटल जात आहे.
स्थानीय स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे ग्राउंड लेव्हलची निवडणूक समजली जात असल्याने विधानसभा आणि लोकसभा निवडणूकपेक्षा या निवडणुकीला तेज प्राप्त झालेलं दिसतं. यामध्ये उमेदवाराची प्रतिमा, काम करण्याची शैली आणि सर्वांना न्याय देण्याची क्षमता या तीन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात.. सोबत आता लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या उमेदवाराकडे लक्ष वेधले जात आहे. ही अलिखित मापदंडे लावली असता महेश मेथे पाटील उजवे ठरत आहेत. निरपेक्ष वागणूक, शांत स्वभाव आणि वादापेक्षा कामाला प्राधान्य देणारा माणूस या गुणांमुळे मेथे पाटील यांची उमेदवारी काही निरीक्षकांच्या नजरेत चर्चेचा विषय ठरू शकते. उच्च न्यायालयाने आरक्षणबाबत निकाल दिल्यानंतर निवडणुका जाहीर होतील. त्यांनतर जोरदार चक्रे फिरणार असली तरी विंचूर गटाचे आरक्षण बदलणार नाही; असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. वेळेवर केलेली तयारी ही अर्धी लढाई जिंकल्याचे समजले जाते; त्यामुळे महेश मेथे पाटील यांनी वेळेपूर्वी सुरू केलेली तयारी त्यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे, असे एकंदरीत चित्र आहे.