जेरबंदनंतरही बिबट्याचे हल्ले सुरूच. देवगाव फाटा परिसरात शिक्षकावर केला हल्ला.

निफाड न्यूज वृत्तसेवा : दि.१७ 

भरवस फाटा ते शिर्डी राज्यमार्ग क्रमांक ७ च्या देवगाव फाटा परिसरात अशोकराव मानकर यांचे वस्तीजवळ मुखेड, ता.येवला येथील प्राथमिक शिक्षक प्रकाश यशवंत कांगणे हे चासनळी येथून रविवार दि.१६ रात्री ८ वाजेच्या सुमारास येत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना घडली आहे.

बिबट्याने त्यांच्या पोटरीला चावा घेतला. देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी त्यांच्या मागे असलेल्या बाहेर गावच्या दोन दुचाकीवरील प्रवाशांवर देखील हल्ला करण्यात आला. मात्र, सुदैवाने प्रवासी सुद्धा थोडक्यात बचावले. वाकद येथील संजय बडवर यांनाही याच वेळी पायाला चावा घेतला. काही वेळानंतर मानोरी परिसरातही बिबट्याने पाळीव जनावरावर हल्ला केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी बिबट्याला देवगाव येथे जेरबंद केले होते. त्याला ठार मारावे यासाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला होता. त्यानंतर या परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून बिबटे जेरबंद केले जातील असे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ते हवेत विरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे