निफाड न्यूज वृत्तसेवा :
सीमेवर असलेल्या जवानांच्या माता पित्यांचा सन्मान करणे ही आगळीवेगळी गोष्ट आहे. हा सन्मान आयोजित करणाऱ्या आयोजकांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. ही बाब जवानांना आनंद देणारी ठरणारी असून शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक भास्कर शिंदे यांनी व्यक्त केले. गोंदेगाव (ता.निफाड) येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जवानांच्या माता पिता सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सैनिक आपल्या देशाचे हिरो आहेत. देश सीमेवर त्यांच्या कर्तव्यामुळे देशवासीय निश्चिंत आहेत. जवानांच्या मातापित्यांचा गौरव ही आपली जबाबदारी आहे. त्यांचे माता पिता देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण असून आपली मुले देशसेवेसाठी पाठवून पालकांनी मोठा त्याग केला आहे. देशसेवेच बळ प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांमध्ये रुजवायला हवं, असं ते म्हणाले. पोलीस दलात भरती झालेल्या गायत्रीचं कौतुक आणि पुरस्कारार्थींचं अभिनंदन त्यांनी केले.
श्री. एकनाथ कांगणे, तात्याबाबा भोसले, डॉ. गोरख शिरापुरे, पूजा रुपटक्के यांना गोईरत्न पुरस्काराचे वितरण, पोलीसपदी निवड झालेल्या गायत्री भोसले हिचा सन्मान सोहळा असे कार्यक्रम लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवा सुरासे, निवृत्ती जगताप, चंद्रकांत सांगळे, डॉ. श्रीकांत आवारे, किरण आवारे डॉ. विलास कांगणे, सचिन होळकर, सचिन जगताप, रामभाऊ जगताप, माधव जगताप, प्रदीप तिपायले, अनिल रनशूर, पोलीस हवालदार किशोर लासुरकर, संदीप नागरे, सागर वाघ, ज्ञानेश्वर भडांगे, निलेश सालकाडे, शांताराम कांगणे, प्रवीण नाईक रज्जाक पठाण, विष्णू कांगणे , रवी कांगणे, सुनील कांगणे सचिन कांगणे, हरीभाऊ सांगळे, संदीप कांगणे, संजय कांगणे, महेश मेथे पाटील, योगेश भोसले, संपत नागरे, भाऊसाहेब मोरे, संतोष भोसले, विष्णू भोसले, ज्ञानेश्वर कांगणे, दत्तू साळवे, रावबा साळवे, अमोल भारती, समाधान पाटील आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी, क्रां. वसंतराव नारायणराव नाईक शिक्षक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गावफेरी काढली. शालेय प्रांगणात विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी मुख्याध्यापक रतन दराडे यांच्यासह शालेय शिक्षक आणि सेवकवर्ग उपस्थित होता.