निफाडच्या लोकन्यायालयात ९१० प्रकरणांतुन ४ कोटी ७२ लाख ५२ हजारावर रक्कम वसुली

किरण आवारे : शिरवाडे वाकद

निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निफाड न्यायालयातील न्यायप्रविष्ठ व दाखलपुर्व अशा एकुण ११ हजार ४७१ पैकी ९१० प्रकरणांत तब्बल ४ कोटी ७२ लाख ५२ हजार ९३७ रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे.

निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही.गुजराथी, निफाडचे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.टी.काळे, निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश जे.व्ही.भेंडे, निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एन.एन.जोशी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी.देशपांडे आदींच्या अध्यक्षतेखाली पाच समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाजास प्रारंभ झाला. या लोकन्यायालयात न्यायप्रविष्ठ २०६८ प्रकरणे तडजोडी कामी नेमण्यात आली त्यातील १६६ प्रकरणे सामोपचाराने मिटले. त्यातून ४ कोटी २३ लाख २२ हजार ६१२ रुपये विक्रमी महसुलाची वसुली झाली. लोकन्यायालयात दाखलपूर्व ९४०३ प्रकरणे नेमण्यात आली होती, त्यापैकी ७४४ प्रकरणे तडजोडीद्वारे मिटली. त्यातुन ४९ लाख २० हजार ३२४ रु. वसुल झाले. न्यायप्रविष्ठ व दाखलपुर्व एकुण ११४७१ प्रकरणांपैकी ९१० प्रकरणांत समोपचाराने तडजोडी होऊन एकुण ४ कोटी ७२ लाख ५२ हजार ९३७ रुपयांची वसुली झाली.

निफाड वकील संघाचे अध्यक्ष ॲड.प्रविण ठाकरे, उपाध्यक्ष ॲड.रामनाथ सानप, सचिव ॲड.रामनाथ शिंदे, खजिनदार ॲड.केशव शिंदे, सदस्य ॲड.सुनिल शेजवळ, ॲड.अमोल शिंदे, ॲड.वैशाली मोरे, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी अधीक्षक किशोर जावरे, सहा.अधीक्षक साळवे, वरिष्ठ लिपीक अभिजित कुलकर्णी, प्रविण ठाकरे, योगेश सोनार, सचिन गडकरी आदींनी काम केले. लोकन्यायालय समिती सदस्य म्हणुन ॲड.संजय दरेकर, ॲड.राहुल गायकवाड, ॲड.लक्ष्मण वाघ, ॲड.भावना चोरडिया, ॲड.सुवर्णा चव्हाण यांनी काम पाहिले. या राष्ट्रीय लोकन्यायालयात पक्षकारांसह बँका, महावितरण कंपनी व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रतिनिधींनी मोठया प्रमाणात लोकन्यायालयात सहभाग नोंदविला. क.लिपीक यांच्यासह सर्व वकील, पक्षकार तसेच निफाड न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे