
निफाड न्यूज : दि. ०३
गोंदेगाव (ता.निफाड) येथे श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाचा श्रीदत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, महाप्रसाद आणि विशेष धार्मिक उपक्रमांनी सजलेला दोन दिवसांचा हा उत्सव भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज (दि.०३) संध्याकाळी ५ वाजता हरिपाठाने उत्सवाला सुरुवात होणार झाली. ६ वाजता श्रीची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ ते १२ दरम्यान ‘नवनाथ भक्ती’ कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हे भक्ती गीते ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. उद्या (दि.०४) पहाटे श्रीदत्त मूर्ती अभिषेक आणि होमहवनाने दिवसाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत श्रींची भव्य पालखी मिरवणूक निघेल. सकाळी १० वाजता ह.भ.प. भागवत महाराज नखाते यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन आहे. दत्त भक्तांना या सोहळ्याची उत्सुकता असते. उत्सवासाठी गोंदेगाव येथील गोंदेश्वर भजनी मंडळ तसेच अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलाअसून प.पू. गुरुवर्य तात्याबाबा भोसले, ह.भ.प. भागवत महाराज नखाते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीने हा उत्सव अधिक भव्य होणार आहे.
Comments