‘अभिनव’ शाळेत ‘मी ज्ञानी होणार’ स्पर्धा. देवगाव मधील अभिनव बालविकासच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

 

देवगाव ( अमोल तुपे) :

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, अभिनव बालविकास मंदिर, देवगाव (ता. निफाड) शाळेत राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, खोंदला आयोजित ‘मी ज्ञानी होणार’ या उपक्रमांतर्गत सामान्यज्ञानावर आधारित परीक्षा घेण्यात आली. परीक्षेमध्ये संस्थेमार्फत २६ जूनपासून सामान्यज्ञानावर आधारित दररोज नियमित पाच प्रश्न पाठविले जात होते. सदर प्रश्नांवर आधारित प्रत्येक महिन्याला एक सराव चाचणी घेतली जात होती. ११ जानेवारीस अंतिम परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शंभर गुणांच्या या परीक्षेत शाळेतील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी भरभरून यश मिळविले. या परीक्षेत प्रथम क्रमांक – श्रेयस संभेराव याने मिळवला. द्वितीय क्रमांक त्रिशा राऊत व तृतीय क्रमांक वसंती तुपे हिने मिळवला या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच आराध्या वावधाने, रुद्रवीर शिंदे, सार्थक शिंदे, तन्वी वावधाने व आनम तांबोळी या विद्यार्थ्यांनी देखील चांगले गुण संपादन केले. श्री.सचिन लांडगे सर, मुख्याध्यापक सुदर्शन जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय समितीचे अध्यक्ष गजीराम खुळे, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष भाऊसाहेब बोचरे, उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष सचिन बोचरे, प्राचार्य कैलास गाजरे, पर्यवेक्षक भानुदास उफाडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षिका स्वाती घोटेकर,अश्विनी कोकाटे,जयश्री गांगुर्डे,सोनाली उन्हवणे,आशा सोनवणे,नितेश राऊत,निलेश काशिद,हर्षद बस्ते,प्रताप मोरे,गणेश कोरडे,मनिषा शेळके,वदंना उराडे,सुरेखा मोरे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे