बार्बी गर्ल, बादल पें पांव है, ऐगिरी नंदिनी गीतांवरील बालनृत्यांनी भारावले पालक.. न्यू ब्लॉसम्स इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये रंगले स्नेहसंमेलन.

निफाड न्यूज : दि.२४
                      विंचूर येथील न्यू ब्लॉसम्स इंग्लिश मिडियम स्कूल व समर्थ प्राथमिक विद्यालय विंचूर येथे आयोजित लहान मुलांचे स्नेहसंमेलन चैतन्याने आणि रंगतदार वातावरणात (दि.२३) संपन्न झाले. या कार्यक्रमात बालकलाकारांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
                         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासलगाव येथील महावीर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या च्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाणके होत्या. उपक्रमशील शिक्षक योगेश जगदाळे यांच्यासह मुख्याध्यापिका ज्योती माठा, पूजा निकम, समन्वयक माधवी सहाय, संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री.दरेकर, सचिव अविनाश दुसाने यांच्यासह संचालक मंडळ मंचावर उपस्थित होते.
                   कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली, ज्याने वातावरण अधिक मंगलमय केले. मुख्याध्यापिका माठा यांनी वर्षभरात साजरे केलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. लहानग्यांच्या निरागस हावभावांसह सादर झालेल्या बार्बी गर्ल, बादल पे पांव है, बाईपण भारी देवा, मलंग मलंग यांसह वीसहुन अधिक गीतांनी प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळविली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. पाहुण्यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करत शाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनंदन केले.
                         स्नेहसंमेलनाने उपस्थित पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या मनात संस्मरणीय आठवणी कोरल्या. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम गीताने झाला. प्रत्येक पालकाने या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. सूत्रसंचालन श्रद्धा निमसे, ओवी शिरसाट, प्रणव गायकवाड, रिया गोरे, समीक्षा मांदळे, कार्तिकी सांगळे, प्रतीक्षा निखाडे यांनी केले.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे