आमचं आधुनिक देशप्रेम : लेखक सुदर्शन नवले.

लेखक : सुदर्शन एकनाथ नवले. 

माझा भारत देश हा विविधतेत एकतेच सुंदर उदाहरण आहे. भारत हा प्राचीन संस्कृती, परंपरा, इतिहास, आणि आधुनिकतेचा संगम असलेला एक महान देश आहे. आपल्या देशाला वैविध्यपूर्ण संस्कृती, धर्म, भाषा, आणि परंपरांचा वारसा तसेच भारताचे निसर्गसौंदर्य, प्राचीन इतिहास, आणि समाजातील विविधता हे घटक आपल्या देशाला खास बनवतात. परंतु,  देशाचा नागरिक म्हणून आम्ही काय करतो? काय कर्तव्य आहेत आमचे देशाप्रती? अंधारात सुई शोधल्यासारख आमच देशावर प्रेम.. देशावर आमच प्रेम, देशाभिमान आधुनिक झालय.. फक्त प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन या दिवशीच आमच्या स्टेटस, स्टोरी, ट्विट ला दिसतंय. बदलत्या काळानुसार माणसाने बदलावे पण बदलण्यालाही काही सीमा असावी. विज्ञान युगात आधुनिक काळात आमच देशप्रेम ह्रदयातुन ओठांवर ओठांवरून हातात आणी आता मोबाईलमध्ये येऊन ठेपल आहे. आम्ही आता ध्वज हातात नाही घेत, ध्वजाला सलामी नाही देत. आम्ही ध्वज स्टेटस, स्टोरी ला टाकतो आणी फक्त चोविस तासासाठी आमच देशप्रेम दाखवतो. संस्कृती टिकली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे मग देशाच काही होवो आम्हाला काही घेण नाही. संस्कृती असेल देशाभिमान असेल खर्या अर्थाने महापुरुषांनी टिकवला. फुल नाही पण फुलाची पाकळी इतपतही आम्ही त्या मुल्यांच संवर्धन करत नाही. देशाची प्रगती व्हावी भ्रष्टाचार कमी व्हावा प्रदुषण कमी व्हाव असे आम्ही मुबोली संकल्प करून दरवर्षी २६ जानेवारीला वृक्षारोपण करतो पण खड्डा मात्र तोच. डिजिटल/आधुनिक प्रेम दाखवतोय आम्ही. झाड लावताना एक फोटो, पाणी टाकताना एक फोटो, अन् गोळ्या खाऊन सगळे घरी… रस्त्यावरचा कचरा साफ करण्यापासून ते देशातील भ्रष्ट लोकांच्या डोक्यातील कचरा साफ करण म्हणजे हे आमच देशप्रेम.

देशावर संकट आले मग ते नैसर्गिक असो वा मानवनिर्मित असो त्यावेळी आम्ही भारतीयांनी एकत्र येऊन एकजुटीने यशस्वीपणे त्या संकटाला सामोरे जान आणि देशाची आण,बान, शान राखून ठेवण ही खरी देशभक्ती, देशाभिमान आणि देशप्रेम आहे.

    (लेखक कायद्याचे विद्यार्थी आहेत.)

 

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे