निफाड तालुका नाभिक महामंडळाच्या देवगाव गटप्रमुख पदी प्रमोद तुपे तर उपाध्यक्षपदी गणेश वैद्य यांची फेरनिवड..

निफाड न्यूज वृत्तसेवा : दि. २८. 

निफाड तालुका नाभिक महामंडळाची देवगाव गटाची बैठक खेडले- झुंगे (संतवन) येथे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, प्रमोद तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत दाढी-कटींगच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सलुन व्यवसाय दरवाढ, गट संघटन, सलुन व्यवसायीकांच्या इतर समस्यांसह अनेक विषयांवर चर्चा होऊन एक मताने निर्णय घेण्यात आले. सलूनसाठी वापरण्यात येणारे साहित्य, कॉस्मेटिक, वीजदरात प्रचंड वाढ झालेली आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून सलून व्यावसायिकांनी दरात वाढ केलेली नव्हती.
मात्र वाढती महागाईमुळे संघटनेने दाढी-कटींगसह विविध प्रकारच्या सलूनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय संघटनेचे नाभिक महामंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक दत्ताशेठ अनारसे, प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सलुन दरवाढीचा निर्णय घेण्यात घेतला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, तालुकाध्यक्ष डाॅ. प्रकाश वाघ, प्रमोद तुपे, प्रमोद सोनवणे, वैभव वैद्य, गणेश वैद्य,अक्षय वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी देवगाव गटाच्या अध्यक्षपदी प्रमोद तुपे यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी गणेश वैद्य यांची निवड करण्यात आली. यावेळी अभिजित जगताप, शशिकांत महाले,वैभव वैद्य,संदिप वाघ,अक्षय वैद्य,पिंटू बनभेरु,गणेश वैद्य रामकृष्ण कणसे कृष्णा कणसे ,अरूण कणसे ,शंकर वैद्य ,अक्षय वैद्य,मनोज अनारसे,भास्कर शिंदे, शांताराम बनभेरू, नंदकीशोर बनभेरु, बन्सी बनभेरू, निलेश शिंदे, शामराव वैद्य, गोरख वैद्य, नवनाथ वैद्य, सोमनाथ वैद्य, निलेश कणसे, हरिहर वैद्य, सोपान कणसे, गोपाळ कणसे, कैलास कणसे, नारायण कणसे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे