विंचूरमध्ये विज्ञानाचा जागर ! न्यू ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल आणि समर्थ प्राथमिक विद्यालयात बहरली सृजनशीलता.

 

निफाड न्यूज वृत्तसेवा : दि. 28

न्यू ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल आणि समर्थ प्राथमिक विद्यालय विंचूर येथे विज्ञान दिवस साजरा  करण्यात आला. कार्यक्रमासाठी एक्झॉटिक कंपनीचे जनरल मॅनेजर पुरुषोत्तम बाहेती, के .के. वाघ पॉलीटेक्निक कॉलेज नाशिक हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रवीण भंडारी उपस्थित होते. पुरुषोत्तम बाहेती यांनी विद्यार्थ्यांना फळांवर प्रक्रिया करून आपण कशा पद्धतीने नवीन उत्पादन निर्मिती करू शकतो याबाबत माहिती दिली. सोबतच, विंचूर येथील एमआयडीसी कंपनीला विद्यार्थ्यांनी एक फील्ड विजिट द्यावी असे निमंत्रण देखील दिले. प्रवीण भंडारी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. जय जवान, जय किसान, जय विज्ञान ,जय अनुसंधान ! असा बदलत्या काळानुसार चा नारा घोषित केला .याप्रसंगी विद्यालयाचे चिटणीस अविनाशजी दुसाने , अध्यक्ष संजय दरेकर, संचालक  दिलीप कोतमिरे,  महाजन, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संतुलन ,प्रदूषण ,विज्ञान, भूमितीय आकृती ,पोषण आहार ,इत्यादी विषयासंबंधी प्रकल्प तयार केले व त्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता काळे यांनी केले तर आभार सुमित्रा व्यास यांनी केले .सर्वप्रमुख पाहुणे, संचालक मंडळ ,विद्यालयाच्या प्राचार्य ज्योती माठा, समर्थ विद्यालयाच्या प्राचार्य पूजा निकम, समन्वयक सहाय ,  सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अभिनंदन केले आणि विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे