शिवचरणी विद्यार्थ्यांची शिवगाथा… विंचूरच्या न्यू ब्लॉसम स्कुल मध्ये शिव जयंती सोहळा.

निफाड न्यूज वृत्तसेवा : दि. १९

विंचूर येथील न्यू ब्लॉसम इंग्लिश मिडियम  स्कूल तसेच समर्थ प्राथमिक विद्यालय विंचूर येथे ३९५ वा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती माठा, पूजा निकम, समन्वयक माधवी सहाय यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे  पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नववीची  विद्यार्थिनी रिया गोरे हिने केलेल्या शिवगर्जनेने परिसरात चैतन्य संचारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांसह मावळ्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल- ताशे व लेझीम पथकाने स्वागत करण्यात आले .शाळेतील नर्सरी ते इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे आणि पोवाडे सादर केले. आठवीच्या विद्यार्थिनींनी ‘मुजरा मानाचा’ या गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर केले. दुसरी मधील विद्यार्थी अवनीश साळी याने लाठी काठीचे प्रदर्शन केले. शाळेतील विद्यार्थिनींनी नऊवारी परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी  पांढरा शर्ट घालून हातात झेंडे घेऊन शिवगर्जना देत होते. शाळेचे शिक्षक नेहा पुंड ,सोनाली ढेपले , गौरव भोईटे, चेतन भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथी ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक  सोहळ्याची नाटिका सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काजल शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी  संस्थेचे अध्यक्ष अँड श्री.संजय दरेकर , सचिव श्री .अविनाश दुसाने व शाळेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे