महात्मा गांधी यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अनुकरणीय : मुख्याध्यापिका ज्योती माठा. न्यु ब्लॉसम इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गांधी पुण्यतिथी साजरी.

निफाड न्यूज : दि. ३०

विंचूर येथील न्यू ब्लॉसम इंग्लिश  मिडियम स्कूल तसेच समर्थ प्राथमिक विद्यालय विंचूर येथे आज (दि.३०) महात्मा गांधीजींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती माठा व समन्वयक माधवी सहाय यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शाळेच्या शिक्षका  चैताली थोरात यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनचरित्राचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. मुख्याध्यापिका  ज्योती माठा यांनी आपल्या भाषणातून ३० जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून का साजरा केला जातो याबाबत विद्यार्थांना माहिती दिली. माठा म्हणाल्या की, “महात्मा गांधीजी अहिंसा आणि सत्यवादी होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ते नेहमीच झटत राहिले. सत्य, अहिंसा, आणि आत्मनिर्भरता हे महात्मा गांधी यांच्या जीवनाचा अभ्यास केल्यास आपणांस दिसून येतात. गांधी यांची विचारशैली आणि जीवनशैली अतिशय साधी होती. त्यांचं अनुकरण विद्यार्थ्यांनी करायला हवे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला.   विद्यार्थिनींनी सागर मती के संत तुने कर दिया कमाल हे समूहगीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष – ॲड. संजय दरेकर, सचिव अविनाश दुसाने व संचालक मंडळ उपस्थित  होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता काळे यांनी केले होते. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे