hgjgh

अर्थात सॅक्रोकोसीजील टेराटोमा नावाचा दुर्मिळ ट्यूमर मणक्याजवळ आणि शेजारील हाडाजवळ वाढत असतो. त्यामुळे जीवघेणी गाठ तयार होऊन जीवावर बेतू शकते. आजाराने ग्रस्त व्यक्तीला लघवी आणि संडासला रोज वाढत जाणारा त्रास व वेदना होतात. इगतपुरी तालुक्यातील एका आदिवासी कष्टकरी कुटुंबातील “लक्ष्मी” नावाच्या २ वर्षीय बालिकेला तिचे आईवडील घोटीतील अन्य दवाखान्यात वारंवार उपचारासाठी आणायचे मात्र तात्पुरता फरक दिसायचा. अखेर कंटाळून त्यांनी नामांकित असणाऱ्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये “लक्ष्मी”ला आणले. संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी तपासणी करून काही चाचण्या करून घेतल्या. त्यामध्ये लक्ष्मी ही चिमुकली दुर्मिळ सॅक्रोकोसीजील टेराटोमा ह्याने ग्रस्त असल्याचे निदान केले. एवढ्या लहान बालिकेवर अवघड शस्त्रक्रिया अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पालकांना समजून सांगितले. त्यानुसार तिच्या पालकांनी डोळे झाकून मातोश्री हॉस्पिटलवर आम्ही विश्वास ठेवतो. या आजारावर आपण जे काही उपचार शस्त्रक्रिया कराल ते आम्हाला मान्य असेल असे सांगितले.fghfgfhfghfh tryrty

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे