संताजी महाराज जगनाडे हे मानवधर्माची शिकवण देणारे संत : दिगंबर सोमवंशी. देवगाव येथे संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी.

देवगाव : अमोल तुपे.

संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेत. संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. संताजी महाराज जगनाडे हे मानवधर्माची शिकवण देणारे संत होते,असे प्रतिपादन देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक दिगंबर सोमवंशी यांनी केले.

ते देवगाव तेली गल्ली येथे तौलिक समाज बांधवाच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी ते बोलत होते.

 

याप्रसंगी संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले. व त्यानंतर महाप्रसाद सुरुवात करण्यात आली. जगन्नाथ शिरसाट, रत्नाकर शिरसाट, दिगंबर सोमवंशी, परसराम राऊत, सुरेश सोमवंशी, रमेश शिरसाठ, बाळासाहेब गाडे, भाऊ सोमवंशी, सचिन सोमवंशी, महेश व्यवहारे, मनोज व्यवहारे, वाळुबा शिरसाठ, विलास शिरसाठ, गणेश शिरसाट, महेश शिरसाठ, बापू राऊत, बाळा राऊत, विजय सोमवंशी, साहील सोमवंशी, यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे