देवपूर येथील वाचनालयात दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शन.

निफाड न्यूज वृत्तसेवा :

देवपुर (ता.निफाड) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सार्वजनिक वाचनालयात दि. ३० आणि ३१ तारखेस ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस आणि नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम महाराष्ट्रभर १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या पंधरवाडयात राबविण्यात येत आहे. विविध ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन वाचन संस्कृती रुजवणे आणि पुस्तक परीक्षण करण्याच्या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे कार्यकारी मंडळ व कर्मचारी यांनी केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे