लाटेवर स्वार होऊन विजयी होण्याचे स्वप्न बघण्याचा हा काळ नाही : डॉ. श्रीकांत आवारे यांची टिका… पाचव्या टर्मला देखील भुजबळ यांच्यावरच गुलाल पडणार असल्याचा विश्वास केला व्यक्त.

येवला – लासलगाव मतदारसंघात उमेदवारी मरत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मागील दहा वर्षांत जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात कोणी बघितले असेल तर मला सांगावे, मी रोख बक्षीस जाहीर करतो. निवडून येण्यासाठी आधी चार वर्षे खर्ची घालावी लागतात.  लाटेवर स्वार होऊन निवडून येण्याचे स्वप्न बघण्याचा हा काळ नसल्याने  यावेळी देखील विकासच जिंकणार.. त्यामुळे येवला – लासलगाव मतदारसंघात […]

कुर्यात सदा मंगलम …. तुळशी विवाहास प्रारंभ ….

गोळेगाव (ता.निफाड) येथील श्री. वाल्मिक मुदगुल यांच्या वस्तीवर आज (दि.१३) तुळशी विवाह संपन्न झाला. भगवान विष्णू आणि तुळशीच्या प्रतीकात्मक विवाह सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असे पाच दिवस तुळशी विवाहाचे ‘कुर्यात सदा मंगलम’ हे स्वर ठिकठिकाणी कानी पडणार आहेत. यथोचित पूजा, भटजी यांचे मंगलाष्टके यांद्वारे हा […]

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे ठार.

तालुक्यातील कोटमगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार झाल्याची घटना घडली आहे. काल (दि.११) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास कोटमगाव – खामगाव रस्त्यावर ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या मादी आपल्या चार बछडेंसोबत रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. याबाबत वनअधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामा केला.

मतदारांना मूलभूत सुविधांची उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा… निफाड विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा…

मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांची उपाययोजना करून मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्या. त्यांनी काल (दि.११) निफाड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची पाहणी करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना केल्या.        आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तात्काळ दुरुस्ती डागडुजी करावी. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान […]

कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून विकाकामांची माहिती द्यावी : सौ. विशाखा पंकज भुजबळ. देवगाव येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन….

“मतदानास कमी कालावधी राहिलेला आहे. या कमी वेळात देवगाव गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाडी वस्ती आणि घरोघरी जाऊन छगन भुजबळ यांनी केलेली विकासकामे सांगावीत. मागील वीस वर्षांपासून सुरू असलेली विकासगंगा भविष्यात सुद्धा सुरू राहील, याची काळजी घेण्याचे आवाहन सौ. विशाखा भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले. देवगाव (ता.निफाड) येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज (दि.१०) भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी […]

विशाखा भुजबळ आज लासलगाव दौऱ्यावर… प्रचार कार्यालयाचे करणार उदघाटन…

आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ लासलगाव – येवला मतदारसंघात गृहभेटी घेत आहेत. काल (दि. 09) जिल्हा परिषद देवगाव गट पिंजून काढल्यानंतर विशाखा भुजबळ आज (दि.10) लासलगाव गटाच्या दौऱ्यावर आहेत. थेटाळे, वनसगाव, ब्राह्मणगाव, टाकळी विंचूर, लासलगाव, पिंपळगाव […]

आ. पंकज भुजबळ यांचा उद्या विंचूर गटात दौरा… कोणत्या गावांना देणार भेटी ? जाणून घ्या.

मा. आ. श्री.पंकज भुजबळ हे उद्या (दि.09) छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ विंचूर व परिसरातील गावांचा दौरा करणार आहेत. विविध नगरे, वाडी, वस्त्या यांच्यासह गृहभेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डोंगरगांव, गोंदेगाव, पाचोरे बु. पाचोरे खुर्द, शिवापूर, वेळापूर, निमगाव वाकडा, ब्राह्मणगाव, विठ्ठलवाडी, किसनवाडी, सुभाष नगर, हनुमाननगर, विष्णूनगर, विंचूर असा त्यांचा प्रचार दौरा राहणार आहे. या […]

छगन भुजबळ यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचा वाकद येथील महिलांचा निर्धार.

जननायक आणि जलनायक असलेल्या छगन भुजबळ यांना मोठ्या मतधिक्क्याने निवडून देण्याचा निर्धार वाकद (ता.निफाड) येथील महिलांनी आज (दि.08) केला. सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी घेतलेल्या छोटेखानी सभेत महिलांनी मतधिक्क्याचा शब्द दिला. यावेळी विविध महिलांनी विशाखा ताई यांचे औक्षण केले. यावेळी राजेंद्र पाटील, अंबादास गायकवाड, सुनील गायकवाड, रामचंद्र शिंदे, सरपंच रेखा भवर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भवर, […]

देवगाव येथे गृहभेटींवर सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा भर… कचरू बोचरे यांना वास्तुशांती निमित्त दिल्या शुभेच्छा.

  येवला – लासलगाव मतदार संघातील देवगाव गटात आज (दि. ०८) सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा प्रचार दौरा असल्याने विविध नगरांसह गृहभेटी देत आहेत.  देवगाव येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक कचरू एकनाथ बोचरे यांच्या वास्तूशांती असलेल्या नवीन घरास सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी कार्यकर्ते यांच्यासह भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोहर बोचरे, धनंजय जोशी, योगेश बोचरे, […]

सौ. विशाखा पंकज भुजबळ आज देवगाव गटाच्या दौऱ्यावर…. जाणून घ्या विशाखा भुजबळ यांचा दौरा.

  निफाड न्यूज : दि. ०८. येवला – लासलगाव मतदार संघातील देवगाव गटात आज (दि. ०८) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय (आठवले) महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ  सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा प्रचार दौरा होत आहे. सदर दौऱ्याची सुरुवात  देवगाव गावातून जगदंबा मातेचे दर्शन घेऊन झाली आहे. या […]

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे