सौ. विशाखा पंकज भुजबळ आज देवगाव गटाच्या दौऱ्यावर…. जाणून घ्या विशाखा भुजबळ यांचा दौरा.

 

निफाड न्यूज : दि. ०८.

येवला – लासलगाव मतदार संघातील देवगाव गटात आज (दि. ०८) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय (आठवले) महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ  सौ. विशाखा पंकज भुजबळ यांचा प्रचार दौरा होत आहे. सदर दौऱ्याची सुरुवात  देवगाव गावातून जगदंबा मातेचे दर्शन घेऊन झाली आहे. या मध्ये देवगाव गटातील महादेव नगर, वाकद, शिरवाडे, कानळद, कोळगाव, खेडलेझुंगे, सारोळे, नांदूर मध्यमेश्वर, दिंडोरी तास, गाजरवाडी, धारणगाव खडक, धारणगाव वीर, रुई, धानोरे असा प्रचार दौरा होणार आहे. या दौऱ्यात देवगाव गटातील बहुसंख्य महिला सामील झालेल्या आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे