छगन भुजबळ यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या : प्रतिक्षा जाधव… कानळद येथे सौ. विशाखा भुजबळ यांनी युवतींशी साधला संवाद.

महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी येवला – लासलगाव मतदारसंघात विविध विकासकामांच्या माध्यमातून विकासगंगा आणली. पाचव्या टर्मला देखील भुजबळ यांच्या लाडक्या बहिणी  त्यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे ठाम मत प्रतिक्षा जाधव या युवतीने व्यक्त केले. कानळद येथील रोहिदास जाधव यांच्या निवासस्थानी सौ. विशाखा भुजबळ यांनी भेट दिली असता यावेळी प्रतिक्षा जाधव यांनी सदर विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित इतर युवतीं सोबत देखील विशाखा भुजबळ यांनी संवाद साधला. अश्विनी जाधव, साक्षी जाधव, कोमल जाधव, आरती गलांडे, साक्षी बोरगुडे आदी आदी युवती यावेळी उपस्थित होत्या. लाडक्या बहिणींच्या भावनिक वक्तव्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे