मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी पात्र ठरलो असेल तर मत मागण्याचा मला हक्क : छगन भुजबळ…. देवगाव येथे प्रचारसभेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. 
मतदारसंघाचा विकास हीच माझी जात, धर्म, पंथ आहे. वीस वर्षांपुर्वी मी येथे आलो तेव्हा देखील विकासाची भाषा बोलत होतो – आजही माझी भाषा विकास हीच आहे.  विकासाची ब्ल्यू प्रिंट ही माझ्यासाठी ज्ञानेश्वरी असून मला करायची आहेत ती कामे रोज नजरेखालून घालतो. मी येवला – लासलगाव मतदारसंघात विकास करण्यासाठी पात्र ठरलो असेल तर मला मत मागण्याचा देखील हक्क आहे. माझ्यासाठी तुम्ही एक दिवस द्या – पुढील पाच वर्षे मी आपल्या सेवेत राहील. असे आवाहन महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी (आज (दि. 14) देवगाव येथील सभेत केले. येवला – लासलगाव मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारार्थ त्यांनी आज मतदारांना संबोधित केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय समोरील मैदानात नागरिकांची तुडुंब गर्दी बघायला मिळाली.
          व्यासपीठावर मा. आमदार कल्याणराव पाटील, प्रचारप्रमुख अंबादास बनकर, मा. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुवर्णा जगताप, देवगाव मा. सरपंच विनोद जोशी, मा. पं. स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, राष्ट्रवादी काँग्रेस निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब भवर, देवगाव गट प्रमुख शिवाजी सुपनर, अशोक नागरे, सुरेखा नागरे, अनिल सोनवणे, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. वैशाली पवार, धनंजय जोशी, योगेश साबळे, नितीन घोटेकर, प्रकाश घोटेकर, बाळासाहेब पुंड, मनोहर बोचरे, राजेंद्र बोचरे आदी  नेते उपस्थित होते.
         वीस वर्षांपूर्वी मला येवल्याचा विकास करावा म्हणून ज्यांनी येथे आणले गेले त्यांनीच पुढील पाच वर्षांत माझे विरोधक म्हणून उमेदवारी केली. मग यांना खरोखर विकास हवा होता की फक्त जिरवाजीरवीचे राजकारण करायचे होते ? ते मतदारांना चांगलं माहिती झालं आहे , अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर केली. वीस वर्षांत मतदारसंघात अनेक विकासकामे केली. येवल्यात विविध ठिकाणी असलेली प्रशासकीय कार्यालये एकाच छताखाली आणल्यामुळे नागरिकांची पायपीट थांबली. विकासाचे हे मॉडेल देशभरात उभे राहायला हवे, अशा शब्दांत शरद पवार यांनी कौतुक केले. उपजिल्हा रुग्णालय इमारतीची प्रशंसा परदेशी नागरिकांनी केली. रस्त्यांचा विकास केला. सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. बंधारे बांधल्याने परिसर हिरवा दिसू लागला. शिवश्रुष्टी स्थापन केली अशी विविध विकासकामे त्यांनी मतदारांपुढे मांडली. जातीपातीचे राजकारण न करता विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. सोबतच येत्या पाच वर्षांतील बाकी असलेल्या कामांची ब्ल्यू प्रिंट त्यांनी मांडली.
        सभेच्या सुरुवातीला मा. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे