लाटेवर स्वार होऊन विजयी होण्याचे स्वप्न बघण्याचा हा काळ नाही : डॉ. श्रीकांत आवारे यांची टिका… पाचव्या टर्मला देखील भुजबळ यांच्यावरच गुलाल पडणार असल्याचा विश्वास केला व्यक्त.

येवला – लासलगाव मतदारसंघात उमेदवारी मरत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मागील दहा वर्षांत जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात कोणी बघितले असेल तर मला सांगावे, मी रोख बक्षीस जाहीर करतो. निवडून येण्यासाठी आधी चार वर्षे खर्ची घालावी लागतात.  लाटेवर स्वार होऊन निवडून येण्याचे स्वप्न बघण्याचा हा काळ नसल्याने  यावेळी देखील विकासच जिंकणार.. त्यामुळे येवला – लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ हे पाचव्या टर्मला देखील गुलाल घेणार असल्याचा विश्वास डॉ. श्रीकांत आवारे यांनी व्यक्त केला. देवगाव (ता.निफाड) येथील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचेवर त्यांनी खरमरीत टिका केली.
   छगन भुजबळ हे विकासाचे दुसरे नाव आहे. विकासाच्या मुद्द्यावरच ते यंदा देखील निवडून येतील. आमदारकी म्हंटल की आधी चार वर्षे मतदारसंघ पिंजून काढावा लागतो. आदरणीय शरद पवार आणि जरांगे पाटील यांच्या लाटेवर निवडणूक जिंकता येईल असा भ्रम उमेदवाराने बाळगू नये ; त्यासाठी जनमानसात रुजावं लागतं- असे ते म्हणाले. देवगाव जिल्हा परिषद गटात यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीची पहिलीच सभा आहे. या सभेसाठी खचाखच गर्दी झाल्याचे बघायला मिळाली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे