गोळेगाव (ता.निफाड) येथील श्री. वाल्मिक मुदगुल यांच्या वस्तीवर आज (दि.१३) तुळशी विवाह संपन्न झाला. भगवान विष्णू आणि तुळशीच्या प्रतीकात्मक विवाह सोहळ्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत असे पाच दिवस तुळशी विवाहाचे ‘कुर्यात सदा मंगलम’ हे स्वर ठिकठिकाणी कानी पडणार आहेत. यथोचित पूजा, भटजी यांचे मंगलाष्टके यांद्वारे हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी साईनाथ मुदगुल, कारभारी मुदगुल, दत्तात्रय मुदगुल, दगु जाधव, सचिन कांगणे, शरद खंडीझोड, केदु खंडीझोड, काळू जाधव, आनंदा मुदगुल, एकनाथ अलगट, आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Similar Posts
By निफाड न्यूज
By निफाड न्यूज
Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
Join WhatsApp Group