जननायक आणि जलनायक असलेल्या छगन भुजबळ यांना मोठ्या मतधिक्क्याने निवडून देण्याचा निर्धार वाकद (ता.निफाड) येथील महिलांनी आज (दि.08) केला. सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी घेतलेल्या छोटेखानी सभेत महिलांनी मतधिक्क्याचा शब्द दिला. यावेळी विविध महिलांनी विशाखा ताई यांचे औक्षण केले. यावेळी राजेंद्र पाटील, अंबादास गायकवाड, सुनील गायकवाड, रामचंद्र शिंदे, सरपंच रेखा भवर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भवर, रवींद्र गायकवाड, युसूफ कादरी, प्रकाश वाळुंज, साहेबराव गायकवाड, अनिल गायकवाड, वसंतराव गोसावी यांच्यासह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.
