जलनायक जननायक छगन भुजबळ यांना बहुसंख्य मतांनी निवडून द्या :- सौ. विशाखा भुजबळ… धारणगाव वीर येथे कॉर्नर सभेस प्रचंड प्रतिसाद.

जननायक – जलनायक छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून गृहिणींच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरला आहे. येवला- लासलगाव मतदारसंघात पाण्याची कमतरता दूर करण्यास छगन भुजबळ यांनी प्राधान्य दिलं आहे. रस्ते विकास, दळणवळण यांच्या माध्यमातून विकास साधला असल्याने या पंचवार्षिकला देखील भुजबळ यांना बहुसंख्य मतांनी निवडून देण्याचे आवाहन सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी मतदारांना केले. धारणगाव वीर येथे आज (दि. 08) झालेल्या कॉर्नर सभेत मतदारांना सौ. विशाखा भुजबळ यांनी संबोधित करत छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना दिली. या छोटेखानी सभेस नागरिकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच दीपक सोनवणे,राजेंद्र भाऊ गंभीरे, विष्णुपंत पुंड, राजेंद्र चिंधु गंभीरे, संदीप सानप, सिराजभाई शेख, सुनील गायकवाड, सोमनाथ नारायण गंभीरे, सुरेश सानप, अप्पाभाऊ सांगळे, हेमंत सोनवणे, अंबादास पुंड, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे