आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ लासलगाव – येवला मतदारसंघात गृहभेटी घेत आहेत. काल (दि. 09) जिल्हा परिषद देवगाव गट पिंजून काढल्यानंतर विशाखा भुजबळ आज (दि.10) लासलगाव गटाच्या दौऱ्यावर आहेत. थेटाळे, वनसगाव, ब्राह्मणगाव, टाकळी विंचूर, लासलगाव, पिंपळगाव नजिक, कोटमगाव, सारोळा, खडक माळेगाव आदी गावांतील मतदारांशी त्या संवाद साधणार आहेत. तसेच, लासलगाव येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन देखील विशाखा भुजबळ यांच्याहस्ते होणार आहेत. यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका सुवर्णा जगताप, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बेलकवडे, सुरेखा नागरे, मनिषा आवारे यांच्यासह महिला असणार आहेत.
