आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज (दि. ०९) जिल्हा परिषद गटाच्या लासलगाव दौऱ्यावर आहेत. आज सकाळी थेटाळे (ता. निफाड) येथे त्यांनी महिला मतदारांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, विविध योजना त्यांनी मतदारांपुढे मांडली. यावेळी महिला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद बघायला मिळाला. लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गात चैतन्याचे वातावरण असल्याचे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले.
Similar Posts
Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
Join WhatsApp Group