छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांची विंचूर मध्ये प्रचारात आघाडी… आठवडे बाजारसह गृहभेटींवर भर…

विंचूर : सुमंगल नगर येथे गृहभेटी देत छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला.

 

उमेदवारी अर्ज माघारीनंतर सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे उमेदवारांनी आता प्रचार करण्यावर भर दिला आहे. येवला – लासलगाव मतदार संघातील विंचूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे आज गुरुवार, (दि. 07) बघायला मिळाले. आठवडे बाजाराचा दिवस असल्याने आणि त्यात दिवाळी निमित्त परिसरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी असल्याची संधी साधत कार्यकर्त्यांनी बाजारपेठसह विविध नगरांत प्रचार केला. दिपावली पार्श्वभूमीवर आठवडे बाजारात गर्दीचा उच्चांक होता. त्यामुळे भुजबळ यांचा प्रचार आणि माहितीपत्रके वाटण्याबरोबरच कार्यकर्त्यांनी परिसर पिंजून काढला. यामध्ये पांडुरंग नगर, मारवाडी पेठे, एकलव्य नगर, मदिना चौक, खंडेराव मंदिर, सुमंगल नगर, बाजार, भवानी पेठ, सिद्धार्थ नगर आदी ठिकाणी गृहभेटी घेत भुजबळ यांनी केलेली विकासकामे जनतेला सांगितली. सरपंच सचिन दरेकर, प्रथमेश राऊत, धीरज राऊत, सुरज राऊत, जयंत साळी, राजेंद्र भारती, गोविंद हिरे, सागर गरड, सोहम साळवे, प्रसाद शिंदे, अतीत दिवटे, यश चौधरी, प्रशांत वज्रे, आदी कार्यकर्ते प्रचारात सामील होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे