किरण आवारे : शिरवाडे वाकद
आर्थिक गुंतवणुक करुन घेवुन दामदुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करुन गुंतविलेले पैसे परत न देता आर्थिक फसवणुक झालेल्या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात संबंधित कंपनी गँगच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित इसमाच्या पत्नीने लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात असलेल्या माहितीनुसार, सतिष पोपटराव काळे, योगेश काळे, शिंदे (पूर्ण नाव माहित नाही) रा.टाकळी विंचुर, भोसले (पुर्ण नाव माहित नाही) रा.भरवसफाटा यांनी स्टार इन्सपायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड लासलगाव ही पैसे दामदुप्पट करुन देणारी कंपनी स्थापन करुन यातील फिर्यादीचे पतीचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडुन फिर्यादी यांची सासु, सासरे, नंनद, मुलगी यांचे नावाने सुमारे ५५ लाख रुपये गुंतवणुक करुन घेतले. सदर पैसे दामदुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक केली. गुंतवणूकदारांचे गुंतविलेले पैसे परत न देता सदर कंपनीवर लोकांची आर्थिक फसवणुक केल्याबाबत गुन्हा दाखल असून सदर कंपनी एक माहिन्यापासून बंद आहे. त्यामुळे फिर्यादीचे पतीने मानसिक नैराश्यातुन दि.३० ऑक्टो. रोजी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे फिर्यादीचे जखमी पती यांची आर्थिक फसवणुक करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून काळे गँगच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गु.रजि.नं.- २७१/२०२४, भारतीय न्याय २०२३ चे कलम १०८,३१८(४) ,३१६(२),६२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश पालवे यांनी भेट दिली असून स.पो.नि.बी.जे.शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि.आप्पासाहेब हंडाळ अधिक तपास करीत आहे.
2 Comments