….त्या बालकाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश.

शिरवाडे वाकद : किरण आवारे.

शुक्र.दि.२० डिसें. रोजी चासनळी येथील गोदावरी नदीपात्रात एक गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

या गंभीर घटनेमुळे तपासाचे एक मोठे आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांसमोर होते. कोपरगाव ग्रामीण पो.नि.संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची ओळख पटवली असून  त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे. कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय ४ वर्ष असे मयत चिमुकल्याचे नाव असून तो साकोरे मिग ता. निफाड जि.नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत कार्तिक बालवाडीत शिक्षण घेत होता व तो हुशार होता. कार्तिक हा गेल्या दोन महिन्यापासून त्याच्या आई सोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. मात्र, कार्तिकचा मृतदेह नदीत कसा आला? नेमकं कोणी गाठोड्यात बांधून मृतदेह नदीत आणून टाकला? कार्तिक आई सोबत राहत असल्याने संशयाची सुई त्याच्या आई भोवती फिरत असल्याने पोलीस तपासात नेमकं काय? निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे अशी माहिती पो.नि.संदीप कोळी यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे