विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लासलगाव पोलिसांचा रूट मार्च…  भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडणार असल्याची स.पो.नि.भास्कर शिंदे यांची ग्वाही. 

अमोल तुपे : देवगाव.

विधानसभा निवडणूकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि समाजकंटकांवर वचक राहावा यासाठी लासलगाव  पोलिसांनी देवगाव (ता. निफाड) येथे आज (दि.02) रूट मार्च काढला. आचारसंहितेचे पालन करत प्रशासनास सहकार्य करावे. भयमुक्त वातावरणात मतदान करावे असे आवाहन लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. भास्कर शिंदे यांनी यावेळी केले.

          ग्रामपंचायत कार्यालयापासून रूट मार्चची सुरुवात करण्यात आली. मारुती मंदिर परिसर, श्री स्वामी समर्थ नगर, रमाई नगर, इंदिरानगर, यामार्गाने येऊन मेनरोड येथे रुटमार्चची सांगता करण्यात आली. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सशस्त्र रुटमार्चमध्ये जम्मु काश्मीर राज्यातील राज्य सशस्त्र दलाचे तिन अधिकारी, ५१ कर्मचारी, तीन पोलिस अधिकारी, १० पोलिस अंमलदार, पोलीस पाटील सुनील बोचरे, तंटामुक्ती अध्यक्ष, लाठी, हेल्मेट वाहनांसह सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे