आ. पंकज भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ विंचूर गटाच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी आज (दि.09) गोंदेगाव येथील विविध वस्ती, नगरे यांना भेटी दिल्या. भाऊसाहेब संपत कांगणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन आ.पंकज भुजबळ यांनी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. ” गोंदेगाव मतदार छगन भुजबळ यांच्यासोबत आहेत. गत पंचवार्षिकला देखील या गावाने लीड मिळवून दिले होते. यंदा देखील असेच प्रेम असू द्या ” अशी साद पंकज भुजबळ यांनी मतदारांना घातली. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंढरीनाथ थोरे, उपसभापती गणेश डोमाडे, पांडुरंग राऊत, विंचूर सरपंच सचिन दरेकर, माधव जगताप यांच्यासह नेते उपस्थित होते.
गोंदेगाव आणि परिसरात केलेली विकासकामे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा सोडविण्यात आलेला जटील प्रश्न, रस्त्यांचा विकास मिटलेला पाणीप्रश्न आदी विकासमांची माहिती मतदारांना देण्यात आली. यावेळी पुंडलिक कांगणे, निवृत्ती कांगणे, लक्ष्मण कांगणे, मा. सरपंच शांताराम कांगणे, ग्रामपंचायत सरपंच अनिल रणशूर, अल्पसंख्यांक नेते रज्जाक पठाण, वाल्मिक सांगळे, सुधाकर कांगणे, सोसायटी संचालक संजय कांगणे, अशोकराव नागरे, दत्तू डुकरे, योगेश कांगणे, योगेश रणशूर, बळीराम कांगणे, पुंडलिक कांगणे, उत्तम सानप, बळीराम कांगणे, रावसाहेब कांगणे, विठ्ठल कांगणे , नितीन कांगणे, विक्रम कांगणे, योगेश सांगळे, रघुनाथ सानप, विष्णू कांगणे , संजय कांगणे, उत्तम रणशूर, योगेश भोसले, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संतोष साळवे, नरहरी साळवे, चंद्रकांत साळवे, बाबासाहेब साळवे, शंकर दगु साळवे, अशोक गोसावी, रामा साळवे, सचिन कंगणे, जालिंदर खामकर आदी उपस्थित होते. येथील मतदारांशी संवाद साधल्यानंतर आ. पंकज भुजबळ यांनी उत्तम रणशूर आणि नरहरी साळवे यांच्या वस्तीवर दुचाकीने प्रवास करत गृहभेटी दिल्या.