येवला- लासलगाव मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचार चमूने जोर पकडला आहे. गेली काही दिवसांपासून आ. पंकज भुजबळ आणि त्यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ यांनी निफाड तालुक्यातील ४६ गावे आणि येवला तालुका पिंजून काढला आहे. विविध गावे, वाडी – वस्ती, शहरांतील नगरांना भेटी देऊन छगन भुजबळ यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवली जात आहेत.
आ. पंकज भुजबळ आज (दि.११) विंचूर दौऱ्यावर आहेत. विंचूर येथील संपर्क कार्यालयात पोहचल्यावर राष्ट्रवादी नेते, शिरवाडे गावचे सरपंच आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्रीकांत आवारे यांचा जन्मदिवस असलेबाबत समजले. नियोजित दौरा वगळून आ. पंकज भुजबळ यांनी डॉ. आवारे यांना शुभेच्छा देण्यासाठी लासलगाव गाठले. डॉ. आवारे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पांडुरंग राऊत यांच्यासह नेते उपस्थित होते.