विशाखा भुजबळ शेतकऱ्यांच्या बांदावर…कांदा लागवडीची घेतली अनुभूती.

चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. 

येवला – लासलगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांचा विंचूर गटातील प्रचार संपवून काल (दि.10)  सौ. विशाखा पंकज भुजबळ यांनी पाटोदा गटातील मतदारांच्या भेटी घेतल्या. या प्रवासात शिरसगाव – लौकी (ता.येवला) येथे रस्त्यालगत काही महिला कांदा लागवड करत असल्याचे विशाखा भुजबळ यांनी बघितले. त्वरित चालकास वाहन थांबण्याच्या सूचना देऊन कार्यकर्त्यांसह शेताची वाट धरली. यावेळी कांदा लागवडीत व्यस्त असलेल्या महिलांसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. कांदा लागवड प्रक्रिया ते विपणन व्यवस्थेपर्यंतची माहिती शेतकऱ्यांकडून समजावून घेतली. हातात खुरपे घेऊन कांदा लागवड करण्याची अनुभूती देखील घेतली. विशाखा भुजबळ यांनी महायुती सरकारने माहिलांसाठी राबविलेल्या योजना समजावून सांगितल्या. यावेळी महिला पदाधिकारी यांचेसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे