सचिन कांगणे यांच्या वास्तूशांतीनिमित्त विशाखा भुजबळ यांनी दिल्या शुभेच्छा… वैराग्यमूर्ती हभप. तुकारामबाबा जेऊरकर यांचे घेतले आशीर्वाद.

आ. छगन भुजबळ यांच्या स्नुषा आणि आ. पंकज भुजबळ यांच्या पत्नी सौ. विशाखा भुजबळ या येवला – लासलगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (दि. 10) त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह देवगाव,विंचूर आणि पाटोदा गटात गृहभेटी दिल्या. गोंदेगाव येथील श्री. सचिन परशराम कांगणे यांच्या नववास्तुस भेट देत वास्तुशांती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी योगेश कांगणे, शिवाजी जगताप, वाल्मिक मुदगुल, सुनील कांगणे, हरिभाऊ सांगळे, कारभारी मुदगुल, विष्णू कांगणे, भाऊसाहेब रणशूर, धनंजय कहाणे आदी उपस्थित होते. वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांचे आशीर्वाद विशाखा भुजबळ यांनी घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे