” येवला – लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांनी विकासगंगा आणली. या आधुनिक भगीरथासोबत आपण सर्वांनी उभे राहावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत आवारे यांनी केले. देवगाव (ता.निफाड) येथील छगन भुजबळ यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन सौ. विशाखा पंकज भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी देवगाव गटातील कार्यकर्त्यांना संबोधून ते बोलत होते.
मतदारसंघात मोठी कामे करायची असतील तर मोठा माणूस हवा. त्यामुळे छगन भुजबळ यांना पर्याय नाही. मागील वीस वर्षांपासून येवला – लासलगाव मतदारसंघाने विकास अनुभवला आहे. असाच विकास पुढे चालू ठेवूया. असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. माणूस मोठा झाला की नामदार होतो आणि नामदार भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचा केलेला कायापालट उभ्या महाराष्ट्राने बघितला असल्याचे डॉ. आवारे यांनी सांगितले. देवगाव गटात छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून झालेली कामे मतदारांपर्यंत पोहचवावी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रवादी नेते भाऊसाहेब भवर, मा. पं. स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, मा. सरपंच विनोद जोशी, मा. पं. स. सभापती शिवाजी सुपनर, मा. पं. स. सदस्य सुरेखा नागरे, उज्वला पैठणकर आदी मंचावर होते.
या वेळी कृष्णा पारखे, गोरख शिंदे, रामदास शिंदे, रामदास गोरडे, राधु बोचरे, रत्नाकर शिरसाठ, बन्सी आढंगळे, शाम लोहरकर, धनंजय जोशी, मनोहर बोचरे, दिगंबर सोमवंशी, सतीश बोचरे, मधुकर लोहारकर, राजेंद्र बोचरे, दीपक आढंगळे, सोमनाथ मेमाणे, रेवन लोहारकर, योगेश कुलथे, राजेंद्र माळी, प्रमोद तुपे, अमोल तुपे, कचरू सालपुरे, वैभव जोशी, छगन लोहारकर, शेखर कुलथे आदी उपस्थित होते.