लाडकी बहीण योजना महिलांच्या उन्नतीसाठी महत्वाची आहे. त्यामुळे महिलांना सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मदत झाली असून जागोजागी लाडक्या बहिणी खुश दिसत आहेत. त्यामुळे येवला – लासलगाव मतदारसंघात लाडक्या बहिणी भुजबळ यांना मतदान करून निवडून देतीलच – असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्ष प्रेरणा बेलकवडे यांनी आज (दि.09) लासलगाव येथे व्यक्त केला. छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी विशाखा भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुवर्णा जगताप, रंजना शिंदे, तालुकाध्यक्ष सुरेखा नागरे, डॉ. वैशाली पवार, ज्योती शिंदे, शितल शिंदे, सोनाली शिंदे आदी मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बालाजी नगर, पाटील गल्ली, गणेश चौक , वार्ड क्रमांक 6 , पिंजारी गल्ली इ ठिकाणी महिला मतदारांना विविध विकासकामांची माहिती देण्यात आली.
Similar Posts
Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
Join WhatsApp Group