गावांचा विकास हा भुजबळ यांच्या कामाचा आरसा : विशाखा भुजबळ…  महिलांच्या समस्या सोडवण्यास तातडीने पाठपुरावा करणार असल्याचा दिला शब्द. 

महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ गावागावांत गेल्यावर घरापुढील नळाला पाणी दिसते, काँक्रेट रस्ते दिसतात, शाळा – दवाखाने ग्रामपंचायत इमारत माध्यमातून विकासकामे दिसतात. गोंदेगावमध्ये प्रवेश केल्यावर असेच चित्र दिसले. ही विकासकामे म्हणजे भुजबळ यांच्या कामाचा आरसा असल्याचे प्रतिपादन सौ. विशाखा भुजबळ यांनी केले. गोंदेगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढी पुतळ्याचा प्रश्न छगन भुजबळ यांनी सोडविला असल्याचे त्यांनी सांगितले. गोंदेगाव (ता.निफाड) येथे लाडक्या बहिणी असलेल्या महिला मतदारांशी विशाखा भुजबळ यांनी संवाद साधला त्यावेळी येवला – लासलगाव मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुवर्णा जगताप, ग्रामपंचायत सरपंच अनिल रणशूर, मा. सरपंच शांताराम कांगणे , रज्जाक पठाण, यांच्यासह महिला मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            गोंदेगावमध्ये राष्ट्रीयकृत बँकेचे असलेली गरज, जलद बस गाड्यांचा थांबा, गोंदेश्वर मंदिराचे पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षण, शिलाई मशीनची उपलब्धता आदी समस्या महिला मतदारांनी विशाखा भुजबळ यांच्यासमोर मांडल्या. सदर समस्या छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नक्कीच सोडविणार असल्याचा शब्द त्यांनी महिलांना दिला. सोबत युवकांसाठी जिम साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे