निफाड न्यूज वृत्तसेवा : दि.१७ भरवस फाटा ते शिर्डी राज्यमार्ग क्रमांक ७ च्या देवगाव फाटा परिसरात अशोकराव मानकर यांचे वस्तीजवळ मुखेड, ता.येवला येथील प्राथमिक शिक्षक प्रकाश यशवंत कांगणे हे चासनळी येथून रविवार दि.१६ रात्री ८ वाजेच्या सुमारास येत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने त्यांच्या पोटरीला चावा घेतला. देवगाव प्राथमिक […]
निफाड न्यूज : चंद्रकांत जगदाळे. एक काळ असा होता की जिल्ह्याच्या गावी जाणं म्हणजे मोठी गोष्ट समजली जात असे. कारण गावकऱ्यांची बहुतेक कामं ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयातच मिटायची.. मंत्रालयात जाऊन मंत्र्यांशी बोलून काम मार्गी लावणं हे फार मोठं काम मानलं जायचं. अशा काळात गोंदेगावचा महेश मेथे पाटील हा तरुण अवघ्या २५ व्या वर्षी […]
निफाड न्यूज : चंद्रकांत जगदाळे. गेली अनेक महिन्यांपासून निफाड पूर्व भागात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर देवगाव येथे पिंजऱ्यात अडकला. गत पाच वर्षांपूर्वी बिबट्या हा प्राणी फक्त वन्यजीव म्हणून परिचित होता; परंतु बघण्यात नव्हता. आता अलीकडे मात्र रोजच बिबट्या जेरबंद झाल्याच्या बातम्या कानी येऊ लागल्याने बिबट विषय सवयीचा झाला […]
देवगाव : अमोल तुपे. नारीशक्तीचा उत्सव म्हणावा असा सोहळा निफाड तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर रंगला. ‘खेळ रंगला पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा‘ या नावाने जि.प. नांदुरमध्यमेश्वर गटातील आर्किटेक्ट अमृता पवार यांनी राबविलेला हा उपक्रम महिलांसाठी केवळ खेळांच्या माध्यमातून मनोरंजन नव्हे, तर आत्मविश्वास, मैत्रीभाव आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा ठरला. […]
निफाड न्यूज : श्री. चंद्रकांत जगदाळे. कोरोनाचा काळ म्हंटला की आजही डोळ्यांपुढे उभे राहते ती भीती, अंधार आणि अनिश्चिततेचं राज्य… परिस्थितीच अशी होती की लोक आपल्या घरात शब्दशः कैद झाले होते.. बाहेर फक्त रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे सायरन यांचेच आवाज ऐकू येत.. त्यातून जनतेच्या समोर ठाकले होते ते फक्त मृत्यूचे भय… त्या काळात प्रत्येक जण स्वतःचा जीव […]
सरस्वती एज्युकेशन संचालित न्यू ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल विंचूर येथील आयुष कांतीलाल नागरे हा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन २०२५ – २६ साठी पात्र ठरला आहे. आयुषच्या यशाचे श्रेय त्याच्या पालकांना व मार्गदर्शन करणारे शिक्षक विषय शिक्षिका नेहा पुंड, सुमित्रा व्यास, संगीता जगताप ,जयश्री नेवगे यांना दिले जाते . यशस्वी विद्यार्थी, त्याचे पालक […]
निफाड न्यूज वृत्तसेवा : न्यू ब्लॉसम्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि समर्थ प्राथमिक विद्यालय विंचूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या खास सोहळ्याला नारीशक्तीच्या प्रतीक म्हणून प्रसिद्ध डॉक्टर मनीषा पल्लोड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती माठा, पूजा निकम, समन्वय माधवी सहाय, संपूर्ण शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि […]
किरण आवारे : शिरवाडे वाकद निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निफाड न्यायालयातील न्यायप्रविष्ठ व दाखलपुर्व अशा एकुण ११ हजार ४७१ पैकी ९१० प्रकरणांत तब्बल ४ कोटी ७२ लाख ५२ हजार ९३७ रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश […]
निफाड न्यूज वृत्तसेवा : सीमेवर असलेल्या जवानांच्या माता पित्यांचा सन्मान करणे ही आगळीवेगळी गोष्ट आहे. हा सन्मान आयोजित करणाऱ्या आयोजकांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. ही बाब जवानांना आनंद देणारी ठरणारी असून शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक भास्कर शिंदे यांनी व्यक्त केले. गोंदेगाव (ता.निफाड) […]
धामोरी ता.कोपरगाव येथील वारकरी संप्रदायाचे गं भा मनुबाई मोहन शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तिन मुले, एक मुलगी सुना, नातवंड असा परिवार आहे. त्या महाराष्ट्र नाभिक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश,भास्कर,रतन शिंदे यांच्या मातोश्री आणि देवगाव येथील पत्रकार प्रमोद आणि अमोल तुपे यांच्या आजी होत.