अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या युवकास अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

 

निफाड न्यूज :

लासलगाव येथील एक अल्पवयीन युवतीवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची सजा ठोठावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीची आई यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, आरोपी अतिष दगडु ढगे वय – २४ रा.टाकळी विंचुर, ता.निफाड याने फिर्यादीचे राहते घरात दि.६ नोव्हे २०१९ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास अनाधिकृतपणे प्रवेश करुन फिर्यादीची मुलगी हिस तु तुझे मित्र मैत्रिणी सोबत का फिरते यावरुन वाद घालत कुरापत काढुन फिर्यादीची मुलगी हिचे अंगावर चाकु, चॉपर सारख्या धारदार चाकुने पोटावर हातापायावर वार करुन मारुन तिस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच स्वतःचे अंगावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून गु.र.न व कलम २५७/२०२१९ भा.द.वि कलम ३०७,३०९,४५२ प्रमाणे लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर सेशन केस नं ५४/२०१९ मा.श्री.बा.द. पवार, अपर जिल्हा व सत्र न्यायालय निफाड यांचे न्यायालयात चालली. सरकारी वकील श्रीमती बंगले मॅडम यांनी केस हाताळली. तपास अधिकारी म्हणून सहा.पो.निरी.खंडेराव रजवे व शिवचरण पांढरे यांनी काम पाहिले तर मा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने साहेब व मा,पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे साहेब यांचे सूचनेनुसार व सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनखाली पो.ना किशोर भाउराव लासुरकर, पो.हवा आर.पी.शिंदे यांनी पैरवी केली. मा.न्यायालयाने आरोपी अतिष दगडु ढगे यांस भा.द.वि कलम ३०७ मध्ये दोषमुक्त, भा.द.वि कलम ४५२ मधे ३ वर्ष सक्तमजुरी व १००० रु दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद तर भा.द.वि कलम ३०९ मधे ३ महिने साधी कैद व १००० रु दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैदेची सजा ठोठावली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे