येवला – लासलगाव मतदारसंघात फक्त दोघांनाच डिपॉझिट वाचविण्यात यश… 11 उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त.

चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. 
          येवला – लासलगाव मतदारसंघात यंदा पंचवार्षिक निवडणुकीत 13 उमेदवारांनी नशीब अजमावले होते. त्यातील दोनच उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविण्यात यश आले आहे. अन्य 11 उमेदवारांवर डिपॉझिट जप्तीची नामुष्की ओढवली आहे.
           काल (दि.23) झालेल्या मतमोजणी निकालात छगन भुजबळ यांनी मुख्य प्रतिस्पर्धी माणिकराव शिंदे यांना चितपट केले. या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी 54.15% टक्के मते घेतली तर माणिकराव शिंदे यांनी 43.59 % टक्के मते घेतली. तर उर्वरित 11 मतदारांमध्ये 2.26% टक्के मते विभागली गेली. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या वैध मतांची संख्या गाठता न आल्यामुळे अमोल आहेर, दीपक पाटोदकर, अमोल गायकवाड, जालिंदर खैरनार, जितेंद्र गायकवाड, नरसिंह दरेकर, प्रितम शहारे, भागवतराव सोनवणे, विलास देहाडे, शिवलाल धनवटे, शुभम नाकोड या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
डिपॉझिट जप्ती म्हणजे काय ??? 
उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवाराने डिपॉझिट रक्कम भरलेली असते.  लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 1/6 मते (16.67%) मते मिळविणे आवश्यक असते. ही मतांची संख्या गाठता न आल्यास सदर रक्कम जप्त केली जाते. सदर रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा केली जाते.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे