गोई नदीत २० वर्षीय युवकाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

निफाड न्यूज :

वाहेगांव ता. निफाड येथील २० वर्षीय युवकाचे गोई नदीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाहेगाव ता.निफाड येथील रोहीत लहानु पवार वय २० हा दि.३ नोव्हें सकाळी ८ वाजता कॉलेजला जातो असे सांगून घराबाहेर पडला होता, त्यानंतर त्याचा कोणाशीही संपर्क झाला नाही. याबाबत पो.पा.सचिन आहेर यांनी लासलगाव पोलिसांना खबर दिली असता  पो.नाईक किशोर लासुरकर व सहकारी यांनी त्याचा कसून शोध घेतला. त्याचा शोध घेत असतांना त्याचे दप्तर गोई नदीच्या काठावर मिळाल्याने त्याचा नदीच्या पाण्यात शोध घेतला. आज (दि.४) डिसें रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह गोई नदीच्या पाण्यात मिळुन आला. लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून स.पो.नि.बी.जे.शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.वसंत हेंबाडे अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे