चालकाने बनावट कागदपत्रे बनवून चक्क जेसीबीच परस्पर विकले.

शिरवाडे वाकद :- निफाड न्यूज.

कामावर जेसीबी घेऊन जातो असे सांगत मित्रांच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवून चक्क १५ लाख रुपये किमतीचे जेसीबी परस्पर विकल्याची घटना घडली असून ८ आरोपींच्या विरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सचिन सुधाकर जाधव रा.कुंभारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी वैभव सोमनाथ तांबे रा.नांदुरखुर्द, ता.निफाड हा फिर्यादीचे जेसीबी मशीनवर मशीन ऑपरेटर म्हणून कामावर आहे. दि.२४ सप्टें २०२४ रोजी ९.३० वा.चे सुमारास फिर्यादीचे मालकीचे एम.एच २० सी.एच ६०९६
हे सुमारे १५ लाख रु. किंमतीचे जेसीबी आरोपी वैभव सोमनाथ तांबे याने कामावर न्यायचे आहे असे सांगुन फिर्यादी याचेकडून घेवुन गेला. त्यानंतर उर्वरीत आरोपी सचिन जाधव रा.खेलदरी, ता.चांदवड, गोविंद चव्हाण व बंडु पगार रा.दरसवाडी ता.चांदवड, सचिन पिंगळे, रा.नांदुरखुर्द, ता.निफाड, रोशन आहेर रा.देवळा, सौरभ अर्जुन पवार रा.पाथर्डी फाटा, नाशिक असे सर्वांनी मिळुन नाशिक येथील दलाल विवेक बारसु रहाणे (उर्फ मुन्ना) याचे मार्फतीने संतोष मच्छिन्द्र आकोलकर रा.करंजी, कोल्हेवाडी, ता.पाथर्डी, जि.आहिल्यानगर यांस काहीतरी बनावट कागदपत्रे बनवुन ५ लाख ५० हजार रुपये किंमतीस परस्पर विक्री करुन संगनमताने फिर्यादीचा विश्वासघात केला. त्यांचे फिर्यादीवरून पिंपळगाव (ब) पोलीस ठाण्यात सी.सी.टी.एन.एस ठकबाजी ३२३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४ ), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कोल्हे अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे