निफाड न्यूज: दि.०६
माती परीक्षण केल्याशिवाय शेतीत चांगले उत्पादन घेणे अशक्य आहे. मातीतील पोषक तत्वांचा अभाव त्यामुळे कळतो. म्हणून शेतकऱ्यांनी कमी खर्चात उत्पन्न वाढीसाठी शेतातील माती परीक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देवगाव कृषी सहाय्यक सीमा मगर यांनी केले. देवगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे काल(दि.०५) जागतिक मृदा दिनानिमित्त कृषी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्या बोलत होत्या.
माती परिक्षणामुळे जमिनीतील पोषक तत्वांचे संतुलन राखण्याची सुलभ होते. खते आणि रसायनांचा अपव्यय कमी होऊन पिकाच्या गुणवत्तेत वाढ होते असे मगर यांनी सांगितले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मातीचे नमुने घेऊन जमीन आरोग्य पत्रिकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच लहानू मेमाने, पोलीस पाटील सुनील बोचरे, भास्कर बोचरे, शामराव लोहारकर, दत्ताजी पाटील बँकेचे संचालक राजाराम मेमाने, नाना सोनवणे, दौलत खुळे ,बन्सी अढांगळे, धनंजय गुंजाळ, विजय बोचरे, सार्थक बोचरे, आदी शेतकरी उपस्थित होते.